दिव्यातील ग्लोबल इंग्लिश स्कूल मध्ये अँटी ड्रग जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.
संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता २६ जून : दिव्यातील ग्लोबल इंग्लिश स्कूल मध्ये अँटी ड्रग जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्लोबल इंग्लिश स्कूल, दिवा येथे इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी “अँटी ड्रग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे विशेष मार्गदर्शन मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलिस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर व सहायक पोलीस निरीक्षक वसंत ख़तेले यांनी केले.
सदर कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावणे, त्यांच्यापासून दूर राहण्याचे महत्व पटवून देणे आणि समाजात जबाबदार नागरिक घडविणे हा होता. अमोल कोळेकर व ख़तेले सर यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत प्रभावी आणि थेट संवाद साधत वास्तव परिस्थिती विषद केली. प्रसंगी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी विविध प्रश्न विचारून आपली शंका दूर केली. सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे संचालक महेंद्र दळवी तसेच शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, शिस्त आणि उत्तम नागरिक होण्याची जाणीव निर्माण होते.




