ब्रेकिंग ; दिवा पश्चिम येथे मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे घरातील सामान जळून खाक…..
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १ एप्रिल : दिनांक ०१/०४/२०२६ रोजी ०१:५४ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार बाबुराव रेसिडेन्सी, हनुमान मंदिर शेजारी, दिवा रेल्वे स्टेशन जवळ, दिवा (प.) या ठिकाणी बाबुराव रेसिडेन्सी (तळ +४ मजली इमारत) या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर- १०३, (मालक – श्री. दिनेश सावंत, भाडोत्री :- सुशिल मेस्त्री.) या रूममधील किचनमध्ये विद्युत बोर्डला शॉर्टसर्किट होऊन फ्रिजला आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१- रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी आग लागल्याने किचन मधील विद्युत बोर्ड, वायरिंग व फ्रिज जळाल्याने नुकसान झाले आहे. सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून ०२:४४ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.




