ब्रेकिंगराजकिय

ॲड. संकेत भासे यांच्या पुढाकाराने शिवसैनिकांची तत्परता ; अवकाळी पावसामुळे झालेले खड्डे बुजवले

[wps_visitor_counter]

 

कर्जत: सुमित क्षिरसागर

कर्जत ता २९ मे : कर्जत शहरातील महत्त्वाच्या श्रीराम पुलावर नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे खड्डे निर्माण झाले होते. या खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहतुकीत मोठा त्रास सहन करावा लागत होता, तसेच अपघातांचा धोका वाढला होता.

ही गंभीर परिस्थिती लक्षात घेत कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक ॲड. संकेत भासे यांनी तातडीने पुढाकार घेत पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्वरित प्रतिसाद देत खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केले.

या प्रसंगी अनेक शिवसैनिक उपस्थित होते आणि त्यांनी ही सेवा कार्यभावनेतून पार पाडली. स्थानिक नागरिकांनी ॲड. संकेत भासे यांचे आभार मानत हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

ॲड. संकेत भासे यांनी सांगितले की, “नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या समस्यांवर तात्काळ उपाय करणे हे आमचे कर्तव्य आहे. भविष्यातही जनता केंद्रस्थानी ठेवून विकासकामे सुरू राहतील.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे