ब्रेकिंग

ब्रेकिंग : मुंब्र्यात इमारतीचा सज्जा कोसळून महिलेचा मृत्यू तर ऐक महिला जखमी.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे : दिनांक ०९/०९/२०२५ रोजी ००:३६ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार लकी कंपाऊंड इमारत, मदिना मज्जिद जवळ, कौसा कब्रस्तान जवळ, दौलत नगर, कौसा, मुंब्रा, ठाणे या ठिकाणी लकी कंपाऊंड इमारत, डी- विंग, (तळ+०३ मजली इमारत व १ टेरेस रूम, अंदाजे २५ वर्ष जुने बांधकाम, एकूण ४ रूम)* या इमारतीच्या टेरेस वरील रूम नंबर ४०४ (मालक: श्री. रेहान फर्जानी.) या रूमच्या बाहेरच्या बाजूला असलेला इमारतीचा सज्जाचा काही भाग पडला असून, उर्वरित सज्जा धोकादायक स्थितीमध्ये आहे.

सदर घटनास्थळी मुंब्रा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त श्री. गणेश चौधरी सो., मा. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. यासीन तडवी सो., कार्यकारी अभियंता श्री. महेश बहिरम (मुंब्रा प्रभाग समिती), उपअभियंता (मुंब्रा प्रभाग समिती), मुंब्रा अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी श्री. खेताडे सो., आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह, मुंब्रा प्रभाग समिती निहायक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान १- रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते.

सदर घटनेमध्ये इमारतीच्या बाजूने जाणाऱ्या दोन महिलांवरती सज्जाचा काही भाग पडून सदर महिला जखमी झाल्या होत्या.

जखमी झालेल्या महिलांची माहिती पुढील प्रमाणे: –

१) श्रीमती. इलमा जेहरा जमाली, (स्त्री./ वय २६ वर्षे, सदर जखमी महिलेला स्थानिक रहिवाशांनी काळसेकर हॉस्पिटल, मुंब्रा. या ठिकाणी उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.)

२) श्रीमती. नाहिद जैनउद्दीन जमाली, (स्त्री/ वय ६२ वर्षे, सदर जखमी झालेल्या महिलेला स्थानिक नागरिकांना बिलाल हॉस्पिटल, मुंब्रा. येथे दाखल केले असता, तेथील डॉक्टर यांनी सदर महिलेला मृत घोषित केले. (सदर दोन्ही महिला सना टॉवर, मदिना मज्जिद जवळ, कौसा कब्रस्तान जवळ, दौलत नगर, कौसा, मुंब्रा, या ठिकाणी राहणाऱ्या होते.

सदर ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव सदर इमारतीमधील सर्व रूम रिकामी करून इमारत सील करण्यात आली आहे.vतसेच सदर इमारतीमधील रहिवाशांनी स्वतःची राहण्याची सोय स्वतःच्या नातेवाईकांकडे केली आहे.

सदर घटनास्थळी धोकादायक झालेला सज्जाचा भाग व रूम नंबर ४०४ मधील धोकादायक विंडो ग्रील अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने काढण्यात आला आहे. सदर घटनास्थळी पुढील कार्यवाही मुंब्रा प्रभाग समिती व अतिक्रमण विभाग मुंब्रा यांच्याकडून करण्यात येणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे