गुन्हेगारीब्रेकिंग

दिव्यात एकाची आत्महत्या तर दुसऱ्या घटनेत पतिकडून पत्नीची हत्या. दिवा पोलीस स्टेशन तात्काळ सुरु करण्याची मागणी.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता ४ फेब्रु : दिव्यात बेडेकर नगर येथे खरवलीआई चाळ येथे सुशांत यादव (वय 39) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यादव यांनी अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घरात कोणीही नसल्याची संधी साधत सुशांत यादव यांनी सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. सुशांत विवाहित असून ते एका राजकीय पक्षात सक्रिय कार्यकर्ते होते. दरम्यान काल संध्याकाळच्या सुमारास पत्नी घरी आली असता त्याना सुशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तातडीने याबाबत दिवा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला. यादव यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ असा परिवार आहे.

तर दुसऱ्या घटनेत दिवा स्टेशन ते सदाशिव दळवीनगर रस्त्यावरील रुही अपार्टमेंट मध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणारे पती पत्नी यांचे आपआपसात कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणातून पतीने धारदार हत्याराने वार करून पत्नीची हत्या केली असून प्रकरणी आरोपी पतीला दिवा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासाचीचक्रे फिरविण्यात आली असून सदर हत्या प्रकरणी आज ठाणे फॉरनसिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरु असून मृत महिलेला पुढील कारवाईसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवले आहे. सदर महिला हत्या याप्रकरणी अधिक तपास मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक सोनावणे अधिक तपास करत आहेत. दिव्यात वाढती लोकसंख्या व वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर दिवा पोलीस स्टेशन तात्काळ सुरु करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे