कर्जत: सुमित क्षिरसागर
कर्जत ता १० ऑक्टोबर : आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर दृढ विश्वास ठेवत ओलमन ग्रामपंचायत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब भवन, कर्जत येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

या प्रसंगी ओलमन ग्रामपंचायत मधील विनोद पादिर,सुदाम हिंदोळा,संतोश पादिर,किरण ठोंबरे,धर्मा नीरगुडा, भागा हिंदोळा,कुमार पादिर,मारुती पादिर अजित वाघ,भूषण पुंजरा,रवी हिंदोळा,राजेश पादिर,रोहित पादिर,मनीष पारधी,रमेश पादिर,रोहन ठोंबरे,राज मेंगाळ,नीरज पादिर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला
याप्रसंगी बोलताना “शिवसेनेत कधीही नवा-जुना असा भेदभाव केला जात नाही. येथे प्रत्येकाला समान संधी, योग्य सन्मान आणि काम करण्यासाठी बळ दिले जाते.अशी भावना व्यक्त केली.
या प्रसंगी ,युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाळ,माजी उपसभापती मनोहर थोरवे,विधान सभा संघटक शिवराम बदे ,माजी सभापती राहुल विशे, ज्येष्ठ नेते भास्कर दिसले,उप तालुका प्रमुख भरत डोंगरे,ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील,भाऊ झुगरे,अभि शिंगोले,संतोष भुंडेरे,प्रशांत पाटील,अक्षय शिंगटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



