नेरळ- कल्याण राज्यमार्गावर बेजबाबदार नागरिकांमुळे कचऱ्याचा ढीग तर ग्रा.पं चे अक्षम्य दुर्लक्ष ! बेजबाबदार नागरिक व दुर्लक्ष करणाऱ्या ग्रा.पं मुळे नेरळच्या अस्वच्छतेचा प्रश्न मात्र चव्हाट्यावर !
नेरळ: सुमित क्षिरसागर
दि.३ डिसेंबर.नेरळ – कल्याण या राज्य महामार्गावरील तुलशी अपार्टमेंट समोरील बंद केलेले जुने डम्पिंग ग्राउंड समोर रस्त्यावर बेजबाबदार नागरिकांकडून टाकला जाणाऱ्या कचऱ्याचा ढीग तर सदर कचऱ्याचा ढीगाकडे नेरळ ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने, त्या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तर अशा बेजबाबदार नागरिक व दुर्लक्ष करणाऱ्या नेरळ ग्रामपंचायत प्रशासनामुळे नेरळ शहराला थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान पर्यटनस्थळाच्या नावाची ओळख व वारसा हा लाभला असल्याने, माथेरानकडे जाण्याऱ्या जग व देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसमोर नेरळच्या अस्वच्छतेचा प्रश्न मात्र चव्हाट्यावर येत आहे.असल्याने, सुस्त नेरळ ग्रामपंचायत प्रशासन आता हा कचऱ्याचा ढीग उचलणार का? असा प्रश्न नेरळच्या सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नेरळ – कल्याण राज्य महामार्गावरील असलेल्या डम्पिंग ग्राउंड मध्ये कचरा टाकला जात असल्याने, व त्या डम्पिंग ग्राउंड मधील कचऱ्यामुळे येणारी दुर्गंधी व कचरा हा पेटवला जात असल्याने, उटणाऱ्या धुराच्या लोटामुळे या परिसरातील राजेंद्र गुरूनगर मधील सोसायटया व इतर इमारतीमधील नागरिकांना होणारा आरोग्या संदर्भातील त्रास व या संदर्भातील येणाऱ्या तक्रारी व नागरिकांनी केलेला संघर्षामुळे हा डम्पिंग ग्राउंड बंद करून, कचरा हा टाकण्यासाठी बंद करण्यात आला आहे. मात्र त्या परिसरातील काही बेजबाबदार नागरिकांकडून या डम्पिंग गाऊंड समोरील नेरळ – कल्याण राज्य महामार्गावर राजरोश पणे कचरा टाकण्याचे काम सुरू असल्याने, व सदर कचरा हा करदात्या नागरिकांचे आरोग्याचे दुष्ट्रीकोनातून उचलण्याची जबाबदारी ही नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाची असताना तो उचलला जात नसल्याने, व ग्रामपंचायत प्रशासनाचे हा कचरा उचलण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने, या ठिकाणी प्रचंड प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचला आहे. तर या साचलेल्या कचऱ्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीचा सामना हा या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकांना करावा लागत आहे. यामुळे त्यांच्यासह आजूबाजूच्या दुकानधारक व परिसरातील लोकांचा आरोग्याचा प्रश्न हा उपस्थित होत आहे. तर कर्जत – कल्याण राज्य महामार्गावरून मोठया प्रमाणात मुंबई, पुणे आदी सारख्या शहरातील लोकांचा होणारा प्रवास व नेरळ शहराला थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान पर्यटनस्थळाच्या नावाची ओळख व वारसा हा लाभला असल्याने, माथेरानकडे जाण्याऱ्या जग व देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसमोर मात्र अशा बेजबाबदार नागरिक व दुर्लक्ष करणाऱ्या नेरळ ग्रामपंचायत प्रशासनामुळे नेरळच्या अस्वच्छतेचा प्रश्न मात्र चव्हाट्यावर येत असल्याने, सुस्त नेरळ ग्रामपंचायत प्रशासन आता हा कचऱ्याचा ढीग उचलणार का? असा प्रश्न नेरळच्या सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



