संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ९ जून : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना पक्षास यश मिळविण्यासाठी तसेच तळागाळातील कार्यकर्ते एकत्र करून पक्षासचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी पक्षाचे युवानेते व उत्कृष्ट संघटक धीरज दिलीपराव देशमुख यांची युवासेना लातूर जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धीरज दिलीपराव देशमुख यांची पक्षनिष्ठा राजकारणातील अनुभव याच्या जोरावर लातुर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी कामाचा सपाटा चालू केला आहे. मागील मे महिन्यात आठ दिवस मुक्कामी राहून लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेस भेट देऊन येथील मूळ समस्या काय आहेत. या जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागास पत्र देऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सर्वसामान्य जनतेत घुसून पक्ष वाढीचे काम करणाऱ्या आशा धडाडीच्या कार्यकर्त्यांची युवासेना लातूर जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती झाल्यामुळे शिवसेना पक्षास येणाऱ्या काळात निश्चितच यश मिळेल अशी भावना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची झाली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेशजी सरनाईक, युवासेना मुख्य सचिव राहूल लोंढे आणि युवासेना सचिव किरण साळी यांच्या विनंतीनुसार शिवसेना पक्षाच्या ‘युवासेना लातूर जिल्हा निरीक्षक पदी धीरज दिलीपराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




