आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंग

दिव्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान पालिका पथकावर दगडफेक ; सहायक आयुक्तांसह सुरक्षारक्षक जखमी.

मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता २९ : दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असताना ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाला शिवीगाळ, धमकी व धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर) सायंकाळी घडला. यावेळी जमावातून झालेल्या दगडफेकीत दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त प्रवीण फड यांच्या पायाला, तर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक विकास दराडे यांच्या पाठीला दगड लागून दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाचे पथक सायंकाळी सुमारे ७.५० वाजता मुंब्रादेवी कॉलनीतील हरिओम डेअरीसमोर फेरीवाल्यांवर निष्कासन कारवाई करीत होते. यावेळी हातगाडीवर मोमोज विक्री करणाऱ्या प्रद्युम सोमनाथ गुप्ता (वय २४) याने कारवाईला विरोध करत लाकडी दांडा उचलून अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सुरक्षा रक्षकाने त्याला रोखल्यानंतर त्याने पालिका अधिकारी पुन्हा कारवाईसाठी आल्यास मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, संबंधित व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न करणारे पालिका कर्मचारी शिवाजी विकास सांगळे यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याचवेळी घटनास्थळी जमलेल्या गर्दीतून दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी पालिकेच्या पथकाच्या दिशेने दगडफेक केली. या घटनेमुळे अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवावी लागल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन दिवा पोलीस चौकीत आणण्यात आले. शिवाजी सांगळे यांच्या फिर्यादीवरून प्रद्युम गुप्ता तसेच दोन ते तीन अज्ञात व्यक्तींविरोधात सरकारी कामात अडथळा, धमकी, धक्काबुक्की व दगडफेक केल्याप्रकरणी कायदेशीर तक्रार करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

4.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे