नेरळच्या आरोग्यसेवेला नवी दिशा; ‘युनिटी हॉस्पिटल अँड आयसीयू’चे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन
ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना मोठा दिलासा; गंभीर आजारांसह आपत्कालीन उपचारांसाठी स्थानिक पातळीवर मिळणार सुसज्ज आरोग्य सुविधा

नेरळ : सुमित क्षिरसागर

दि.३० ऑगस्ट २०२६:
नेरळ शहर व परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भर पडली असून, नेरळ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘युनिटी हॉस्पिटल अँड आयसीयू’ या आरोग्य सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी हॉस्पिटलच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देत, या आरोग्य सुविधेचा नेरळसह कर्जत तालुक्यातील नागरिकांना मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
नेरळ व परिसरातील नागरिकांना गंभीर आजार किंवा आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी कर्जत, पनवेल, नवी मुंबई तसेच मुंबई येथील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रवास, वेळ आणि आर्थिक खर्चाचा मोठा भार सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नेरळमध्येच हॉस्पिटल आणि आयसीयूची सुविधा उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेषतः कर्जत तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागातील नागरिकांसाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गंभीर आजार, आपत्कालीन परिस्थिती आणि तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णांना जवळच्या ठिकाणी उपचार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने अनेक प्रसंगी रुग्णांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
‘युनिटी हॉस्पिटल अँड आयसीयू’च्या माध्यमातून आधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आवश्यक उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नेरळसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील वाढती आरोग्यसेवेची गरज लक्षात घेता या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलने केवळ वैद्यकीय सेवा न देता ग्रामीण आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा विस्तार करावा, अशा शुभेच्छा दिल्या. स्थानिक पातळीवर दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गंभीर आजारांच्या उपचारासाठी दूरच्या शहरांवर असलेले अवलंबित्व काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या उद्घाटन सोहळ्यास मा. सभापती व युवासेना तालुका प्रमुख श्री. अमर मिसाळ, पंचायत समिती सदस्य श्री. महेश विरले, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. राजेश भगत, सौ. ज्योत्स्नाताई विरले, डॉ. संध्याताई, डॉ. जयेश कटारमल, डॉ. हेमंत शेवाळे, डॉ. कुणाल राठोड, डॉ. रविंद्र गजे, डॉ. राकेश पाटील, डॉ. दिलीप नेहरकर, डॉ. विकास गोमारे, डॉ. तेजस खंडागळे, डॉ. आकाश सोनावळे, डॉ. पंकज राठोड यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
नेरळमध्ये ‘युनिटी हॉस्पिटल अँड आयसीयू’च्या रूपाने आरोग्यसेवेची नवी सुविधा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना तातडीच्या व दर्जेदार उपचारांचा आधार मिळणार असून, कर्जत तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागासाठीही हे हॉस्पिटल महत्त्वाचे आरोग्य केंद्र ठरण्याची अपेक्षा आहे.



