ब्रेकिंग ; दिवा शिळ महापे रोडवर दरड कोसळली…..
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा : आज दिनांक २९/०८/२०२५ रोजी १९:४९ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार पूजा पंजाब हॉटेल जवळ, महापे शीळ रोड, शीळ, ठाणे या ठिकाणी पाण्याच्या टाकीच्या पुढे नवी मुंबई, महापे कडून शीळ फाटाकडे येणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली होती. सदर घटनास्थळी मुंब्रा पोलिस कर्मचारी ०१- खाजगी जे.सी.बी. मशीनसह, अग्निशमन दलाचे जवान ०१- इमार्जन्सी टेंडर वाहनासह तसेच दिवा प्रभाग समिती निहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- जे.सी.बी. मशीनसह उपस्थित होते. सदर घटनेत कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी रस्त्यावर कोसळलेली दरड मुंब्रा पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी जे.सी.बी. मशीनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आली असून, रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे मोकळा करण्यात आला आहे.




