ब्रेकिंग : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ३ जणांना लाच घेताना अटक.
संतोष पडवळ (प्रतिनिधी)
ता २४ जुलै : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या दोन वेगवेगळ्या विभागात ट्रॅप लावून लाच लुचपत विभागाने तीन जणांना लाच घेताना अटक करण्यात आले आहे आरोग्य विभागातील दोन जण व मलनिस्सारण विभागातील एकाला लाच प्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केल्याचा धक्कादायक घटना घडली.
कल्याण डोंबिवली मनपाच्या स्थापनेपासून आतापर्यंत ४७ हून अधिक अधिकारी, कर्मचारी लाच प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. घनकचरा विभागातील आरोग्य निरिक्षक वसंत देगलूरकर ,आणि सहकारी सुर्दशन जाधव या दोघांना आजारी असलेल्या कर्मचाऱ्याकडून परत कामावर रुजू करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले तर कल्याण डोंबिवली मलनिस्सारण विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र अहिरे यांनी एका विकासाला एनओसी देण्यासाठी ४० हजार रूपयांची लाच मागणी प्रकरणी रंगेहाथ अटक करण्यात आले आहे. आज लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात तीन जणांना अटक केल्याने पलिकेतील भ्रष्टाचार थांबता थांबत नसल्याचे उघड होत आहे.




