ठाण्यात ३ कोटी ३९ लाखांचा किमतीचा चरस या अंमली पदार्थासह आरोपी अटकेत.
संतोष पडवळ – ठाणे
ठाणे ता २ ऑगस्ट : मा. पोलीस आयुक्त, ठाणे यांनी अंमली पदार्थ विकी संदर्भात विशेष मोहीम राबवुन कडक कारवाई करण्या संदर्भात आदेश दिले होते. त्याअनुषंगाने मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे डॉ. श्री. पंजाबराव उगले, व मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे श्री. अमरसिंह जाधव यांनी सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने मा. सहा. पोलीस आयुक्त, प्रशासन, ठाणे श्री. विनय घोरपडे यांच्या सुचनेप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल मस्के यांनी विशेष मोहिम राबविली होती.
ठाण्यात मिळालेल्या माहितीनुसार मा. वरिष्ठांचे परवानगीने सापळा कारवाई केली असता दिनांक ३१/०७/२०२५ रोजी २२.३० वा. उथळसर नाका येथील सुप्रब सोसायटी येथील रसोई पोळी भाजी केंद्र ठाणे याठिकाणी आरोपी मोहमद मकसूद मोहमद अहमद, वय ४२ वर्षे, धंदा-ड्रायव्हर, रा.ठि. दुनियागंज आंशिक, फुलपूर, जि अलाहाबाद राज्य उत्तरप्रदेश हा आपले ताब्यात रू. ३,३९,००,०००/- किमतीचा ३ किलो ३९० ग्रॅम ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ विक्रीकरीता बाळगताना मिळून आलेला आहे. करीता सविस्तर पंचनामा करून सदर आरोपीतास वरस हा अंमली पदार्थ व अंगझडतीतील त्याचे वापरातील कपडे, एक पाकीट व एक प्लॅस्टिकची मोठी पिशवी मिळुन आली. करीता सदर पाकिटची तपासणी केली त्यामध्ये रोख रू १७७०/- व आधारकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, नोटीस असा एकुण ३,३९,०७,२७०/- रू. किमतीच्या मुददेमालासह ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदरबाबत राबोडी पोलीस स्टेशन, ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक ३५६/२०२८ एन.डी.पी.एस कायदा कलम १९८५ चे कलम कलम ८ (क), २०(ब) ii (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक आरोपीची दिनांक ०४/०८/२०२५ रोजीपावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे. नमूद गुन्ह्याचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या कडुन करण्यात येत आहे.
अटक आरोपी हा प्रयागराज, उत्तरप्रदेश वा रहीवाशी असुन तो चरस हा अंमली पदार्थ ठाणे येथे विक्री करण्याकरीता आला असताना त्यास ताब्यात घेवुन वर नमुद प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. वर नमुद केले कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थाचे उत्पादन, विकी, वाहतुक, साठवणुक यामध्ये कोण कोण सहभागी आहे? याबाबतचा तपास सुरू आहे.




