ब्रेकिंगराजकिय

दिवा विकास प्रतिष्ठानचे शैलेश पाटील यांनी घेतले शेकडो गणरायांचे दर्शन.

0 5 1 8 8 9

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, ता ४ सप्टें : दिव्यातील गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ढोल-ताशांचा गजर, रंगीबेरंगी सजावट आणि बाप्पाच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा यांनी दिवा शहराला उत्सवाचा रंग चढू लागला आहे. सदर भक्तीमय वातावरणात दिवा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मा. नगरसेवक व उपशहर प्रमुख शैलेश पाटील व कार्यकर्ते शहरातील अनेक घरगुती व गणेश मंडळाना भेटी देत गणरायाचे दर्शन घेत आहे.

भक्तांसोबत गप्पा मारणे, मंडळ कार्यकर्त्यांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडणे हे आपले कर्तव्य असून दरवर्षी प्रमाणे यंदा ही दिव्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या घरी श्रीगणेशाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होते अशीच गणरायाची कृपा आशीर्वाद आमच्यावर राहो तसेच सर्वजनिक गणेश उत्सव मंडळाना भेटी देऊन दिव्यातही युवा वर्गासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, कामगार वर्ग व उद्योग क्षेत्राच्या इच्छा आकांशा पूर्ण व्हाव्यात, महिला, भगिनीं देखील अनेक क्षेत्रात आपले नाव वाढवावे अशी मनोकामना श्री च्या चरणी करत आशीर्वाद घेतले असे शैलेश पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे