आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

ठाण्यातील कल्पतरू पार्कसिटीची 10:90 योजना गुंतवणूकदारांसाठी ठरतेय ‘गेमचेंजर

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता २७ मार्च : शहरातील रिअल इस्टेट बाजारात पुन्हा एकदा गुंतवणुकीची चैतन्यदायी लाट दिसू लागली असून, या वाढत्या आकर्षणामागे महत्त्वाचा घटक ठरतोय कल्पतरू पार्क सिटी या प्रकल्पाची 10:90 पेमेंट योजना. कमी गुंतवणुकीत मोठा फायदा मिळवून देणारी ही योजना गुंतवणूकदारांसाठी ‘सुवर्णसंधी’ मानली जात आहे. या योजनेनुसार खरेदीदारांना सुरुवातीला केवळ 10 टक्के रक्कम भरावी लागते, तर उर्वरित 90 टक्के रक्कम ताबा मिळाल्यानंतर द्यायची आहे. त्यामुळे ईएमआयचा ताण त्वरित येत नाही आणि गुंतवणूक अधिक सुलभ व नियोजनबद्ध होते.

कोलशेत रोडवरील सुमारे 100 एकरांवर उभारलेला हा भव्य टाउनशिप प्रकल्प ठाण्यातील सर्वात मोठ्या निवासी प्रकल्पांपैकी एक मानला जातो. 2, 3 आणि 4 बीएचके घरे, 20+ एकरांचे ‘नमो ग्रँड सेंट्रल पार्क’ आणि 4,500 हून अधिक झाडे यामुळे येथे ‘ग्रीन लिव्हिंग’चा अनोखा अनुभव मिळतो. प्रकल्पामध्ये 400 हून अधिक अत्याधुनिक सुविधा, क्लब हाऊस, क्रीडा संकुल, हाय-स्ट्रीट रिटेल यांचा समावेश आहे. सहा एकरांहून अधिक खुली जागा, फुटबॉल ग्राऊंड तसेच भविष्यात आयसीएसई बोर्डाची शाळा यामुळे हा प्रकल्प परिपूर्ण जीवनशैली देणारा ठरतो.

भिवंडी-नाशिक मार्ग, घोडबंदर रोड यांसारख्या प्रमुख मार्गांशी जवळीक, तसेच प्रस्तावित मुंबई व भिवंडी-कल्याण मेट्रो लाईन्समुळे या परिसराची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होत आहे. प्रकल्पासून जवळ असलेल्या कोलशेत खाडीकिनाराहून जाणारा कोस्टल रोड, कोलशेत खाडीवरील पूल यामुळे प्रवासाची चांगली सोय उपलब्ध होणार आहे. आगामी पायाभूत सुविधांमुळे भविष्यातील मालमत्ता मूल्यवाढीसही चालना मिळण्याची शक्यता आहे. ₹1.3 कोटींपासून सुरू होणाऱ्या किमतींसह या प्रकल्पाची विक्री वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे, 10:90 योजनेचा लाभ 31 मार्चपर्यंत उपलब्ध असून, दर्जेदार जीवनशैली आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी ही संधी गमावू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे