गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा रेल्वे स्थानकात मंगळसूत्र चोरी करणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ अटक

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता २४ ऑक्टो : दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दोन महिलांना ठाणे रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मेघिता आरव काळे (वय २२) आणि अनु बबन काळे (वय ३५, दोघी रा. येरवडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण पाच सोन्याचे मंगळसूत्र, किंमत सुमारे ७ लाख ५५ हजार रुपये हस्तगत करण्यात आली आहेत. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडे चेन व सोन्याचे दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती. त्यानुसार २१ ऑक्टोबर रोजी सकाळपासून महिला पोलीस अंमलदार भारती फाळके आणि अवंतिका सुर्वे यांनी दिवा रेल्वे स्थानकात साध्या वेशात सापळा रचला. सकाळी सुमारे ७.१८ वाजता फलाट क्रमांक दोनवर आलेल्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत एका महिला प्रवाशाचे मंगळसूत्र खेचून पळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी दोन्ही संशयित महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११३०/२०२६, बीएनएस कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ११२८/२०२६ तसेच कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ७९६/२०२६ या गुन्ह्यांशीही त्यांचा संबंध असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. संबंधित चोरीतील सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले असून अन्य दोन गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. ही कारवाई लोहमार्ग मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, सहायक पोलीस आयुक्त निलीमा कुलकर्णी, ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) चिमणाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद देशमुख, रविंद्र घिगे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे