
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता १९ डिसें : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनात्मक अनुभव, समन्वय कौशल्य आणि निवडणूक व्यवस्थापनातील सक्षम नेतृत्व लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली असून भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्यासाठी ते सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रभावीपणे कार्य करतील असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला आहे. सदरच्या नियुक्तीमुळे ठाणे शहरातील निवडणूक तयारीला निश्चितच अधिक बळ मिळणार असून, संघटनात्मक शिस्त, नियोजन आणि एकजूट यांच्या माध्यमातून पक्षाची ताकद अधिक भक्कम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



