ब्रेकिंगमहाराष्ट्र

ब्रेकिंग : नाशिक जवळ सप्तश्रुंगी घाटात इनोव्हा कार दरीत कोसळून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

0 5 1 8 8 9

 

नाशिक ता ७ डिसें : इनोव्हा कार 1200 फूट खोल दरीत कोसळून अपघातात 5 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गड येथील घाट मार्गावर ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. रतनगड परिसरातील (पिकनिक पॉईंट) येथे एक इनोव्हा कार सुमारे 1000 ते 1200 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून मृतांमध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. MH 15 BN 0555 ही कार आज दुपारी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येत असताना अपघातग्रस्त झाले. सदर वाहनात एकूण सात प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघात घटनास्थळी नांदुरी व सप्तशृंगी गड येथील स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, आपत्कालीन पथक व आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरीत कोसळलेल्या वाहनातील मृतदेह बाहेर काढण्याचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. मृतांची ओळख पटलेली आहे. सर्व मृत हे हे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड गावातील असल्याचे समजते. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे