ब्रेकिंगराजकिय

दिवा वंचित बहुजन आघाडी शहरातील सर्व जागा ताकदीने लढणार. पाणी प्रश्न आणि मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणार.

[wps_visitor_counter]

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता ८ सप्टें : दिवा शहरातील सर्वसामान्य, वंचित बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आगामी महापालिका निवडणुकीत दिवा प्रभाग समितीमधील सर्व जागा ताकतीने लढवण्याचा निर्धार केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे विकास इंगळे यांनी याबाबत भाष्य केले आहे. दिवा शहराला भेडसावणाऱ्या पाणीटंचाई सारख्या गंभीर समस्यांवर प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

विकास इंगळे यांनी सांगितले की वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल. दिवा शहरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असणारा वंचित बहुजन समाज गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करत आहे. या समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी योग्य उमेदवारांना संधी देऊन ही निवडणूक लढवली जाईल. दिवा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना वर्षानुवर्षे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या १५ वर्षांपासून येथील जनता पाणी प्रश्नावर प्रशासनाशी संघर्ष करत आहे मात्र अद्याप ही समस्या सुटलेली नाही. दिवा शहरात सर्वसामान्य समाजाचे लोक राहत असल्याने प्रशासन या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का ? असा सवाल इंगळे यांनी उपस्थित केला.

दुय्यम वागणूक संपुष्टात आणणार –

दिवा शहराला जी दुय्यम वागणूक दिली जाते ती मोडीत काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील राहणार आहे. त्यासाठी सर्वसामान्य समाजातील उमेदवारांना निवडणुकीत उतरवले जाईल, असा विश्वास विकास इंगळे यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयामुळे दिवा शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, मूलभूत सुविधा आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांवर निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे