आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

अखेर दिवा भाजप आयोजित शिबिरामुळे मिळाली दोघांना दृष्टी. दिवा शहर मोतीबिंदू मुक्त करणार – डॉ. सतीश केळशीकर.

0 5 1 8 8 8

 

प्रतिनिधी – संतोष पडवळ.

ठाणे, दिवा ता ९ डिसें : भारतीय जनता पार्टी दिवा युवा मोर्चाचे सरचिटणीस शशिकांत (सतीश) मनोहर केळशीकर यांच्या सहकार्याने व डॉ. अग्रवाल डोळ्यांचे हॉस्पिटल डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामुळे आज दिवा शहरात राहणाऱ्या दोन गरीब रुग्णांना दृष्टी मिळाली आहे. परिस्थिती अत्यंत गरीब व हालाखीची असल्यामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया खर्च परवडत नसल्याने सदर रुग्णांनी दिवा भाजप आयोजित शिबिरात भाग घेतला होता त्यानुसार २३ रुग्णांवर मोतीबिंदू शास्त्रक्रिया करावी लागणार असून आज त्यापैकी दोन रुग्णांवर डोंबिवली येथील अग्रवाल नेत्र हॉस्पिटल मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून लवकरच इतर सर्व रुग्णांची भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस शशिकांत (सतीश) मनोहर केळशीकर यांच्या सहकार्याने मोफत शस्त्रक्रिया होईल असे प्रतिपादन अग्रवाल नेत्र रुग्णालय प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

दिवा शहर लवकरच मोतीबिंदू मुक्त करणार असे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस शशिकांत (सतीश) मनोहर केळशीकर यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पार्टी दिवा शिळ मंडळ आणि डॉ. अग्रवाल डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. सदर शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली त्यात मोतीबिंदू शास्त्रक्रियेची नोंदणी करण्यात आलेल्या दोन रुग्णांवर डोंबिवली येथील हॉस्पीटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्याने दिवा भाजप मंडळ अध्यक्ष सचिन भोईर व युवा मोर्चाचे सतीश केळशीकर यांनी रुग्णालयात भेट घेतली. प्रसंगी भाजप दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी सदर रुग्णांच्या भेटी दरम्यान सर्व डॉक्टर्स व केळशीकर यांचे अभिनंदन व कौतुक केले असून असा स्तुत्य उपक्रम भाजपच्या वतीने केला जात असल्याने आनंद व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे