“गुणवंतांचा गौरव, उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणेचा ठेवा” कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

कर्जत | सुमित क्षिरसागर

कर्जत दि.२२ जून २०२६ :दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन, शिवसेना आणि युवासेना कर्जत-खालापूर मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “विद्यार्थी गुणगौरव सोहळा” मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या यशामागील खरे शिल्पकार असलेल्या पालक आणि शिक्षकांचाही विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र थोरवे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कार, जबाबदारी आणि सामाजिक भान जोपासण्याचे आवाहन केले. “आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. शिक्षणासोबत उत्तम नागरिक घडणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणासाठीचे कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन ज्ञानार्जन करण्याचे आवाहन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांसाठी अमर्याद संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. पालकांनी आपल्या मुलांवर करिअरची सक्ती न करता त्यांच्या आवडी आणि क्षमतांना प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते व कीर्तनकार अविनाश भारती यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण, संस्कार, गुरु-शिष्य परंपरा आणि शिस्त यांचे महत्त्व त्यांनी प्रभावी उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीचा दाखला देत ज्ञानप्राप्तीसाठी नम्रता, सेवा आणि समर्पण आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या सोहळ्यास गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, जिल्हा संघटक संभाजी जगताप, विधानसभा संघटक शिवराम बदे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे खालापूर पंचायत समिती उपसभापती श्री भाई शिंदे, माजी उपसभापती श्री मनोहर थोरवे, श्री शशी वर्तक साहेब, नगरसेवक श्री संकेत भासे, नगरसेवक गौरंग वाघेला, नगरसेविका सौ कोयल कान्हेरीकर, उपतालुकाप्रमुख श्री अंकुश दाभणे, उपतालुकाप्रमुख श्री दिलीप ताम्हाणे, उपतालुकाप्रमुख श्री भालचंद्र घोडविंदे, उपतालुकाप्रमुख श्री शरद ठाणगे, उपतालुकाप्रमुख श्री भरत डोंगरे, विभाग प्रमुख श्री सुनील ठाकूर, श्री रमेश मते, शहर प्रमुख श्री संजय मोहिते, शहर प्रमुख श्री अभिषेक सुर्वे, महिला संघटक सौ सुरेखाताई शितोळे, महिला तालुका प्रमुख सौ रेश्माताई म्हात्रे, सरपंच सौ प्रतिभा कारोटे, सौ पूजाताई थोरवे, युवासेना विभाग प्रमुख श्री सनी चव्हाण, श्री नितीन बडेकर, श्री प्रशांत झांजे, श्री दीपक भोईर तसेच मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी पालक व शिक्षक वर्ग उपास्थित होते.



