आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

ठाण्यातील वर्तमानपत्र विक्रेता अनुपकुमार प्रजापती झाला वकील. वर्तमानपत्र विक्रेत्यांसह वर्तमानपत्र कंपनी समुहांकडून अभिनंदन व कौतुक.

0 5 1 8 8 7

 

संतोष पडवळ – ठाणे

ठाणे ता १९ जुलै : ठाणे शहरातील कळवा विभागातील वर्तमानपत्र विक्रेता अनुपकुमार प्रजापती यांनी आपल्या प्रतिकृल परिस्थितीवर मात करून अथक परिश्रमाच्या जोरावर विधी व कायदेविषय पदवी शिक्षण पूर्ण करून BA LLB (वकिल) चे शिक्षण पूर्ण केले आहे. प्रसंगी कळव्यासह ठाणे शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनुपकुमार प्रजापती गेली अनेक वर्ष कळव्यात वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय करत आहे.

प्रतिकूल परिस्थितीत वृत्तपत्र व्यवसाय सांभाळून अनुपकुमार प्रजापती यांनी विधी व्यवसायांसाठी सनद मिळविली असल्यामुळे त्यांचा ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना व सहयोग वृत्तपत्र विक्रेता विकास संस्था यांच्यातर्फे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. प्रसंगी ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथील वर्तमानपत्र विक्रेत्यांसह वर्तमानपत्र कंपनी समुहांकडून अभिनंदन व कौतुक केले जात असून पुढील कारकिर्तीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनुपकुमार प्रजापती यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांना सन्मान मिळावा यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे