दिव्याजवळ ६ गोडाऊनला भीषण आग ; सहा तासांत आग आटोक्यात
ठाणे, दिवा ( संतोष पडवळ ) : दिनांक ०३/०६/२०२५ रोजी ९ वाजता वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार मन्नत हॉल जवळ, खर्डी रोड, चौधरी कंपाऊंड, दिवा, ठाणे. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या ०६- भंगार गोडाऊनला आग लागली होती. सदर घटनास्थळी डायघर पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०३- फायर वाहन, ०१- वॉटर टँकर वाहनासह व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पीकअप वाहनासह, ०१- जेसीबी मशीनसह उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
घटनास्थळी आग लागून नुकसान झालेल्या गोडाऊन क्र १ ते ६ जळून खाक झाले
सदर घटनास्थळी लागलेली आग ०१:३० वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांकडून व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.




