आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

दिव्यात ग्लोबल शाळेच्या मागील बाजूला भीषण आग.

0 5 1 8 8 7

 

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा : आज दिनांक ०७/१२/२०२५ रोजी ४ : १५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार ग्लोबल शाळेच्या मागे, दिवा आगासन रोड, दिवा (पू.), ठाणे या ठिकाणी मोकळ्या जागेत ठेवण्यात आलेल्या बाबूंना व लाकडांना आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-पिकअप वाहनासह उपस्थित होते. घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून १७:०८ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

1/5 - (1 vote)

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे