ब्रेकिंग

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ६ नोव्हेंबर पासून रुळावर….. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा पारंपारिक मुहूर्त पावसामुळे हुकला…

0 5 1 8 8 7

 

नेरळ (माथेरान) : सुमित क्षिरसागर

नेरळ दि.४: दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणारी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन यावर्षी उशिरा धावणार आहे. पूर्वी दसऱ्यानंतर १५ ऑक्टोबरला ट्रेनचा मुहूर्त ठरवला गेला होता, मात्र सततच्या अनियमित पावसामुळे हा मुहूर्तही हुकला. परिणामी, यंदा तब्बल एक महिना उशीर झाला. मात्र, आता ६ नोव्हेंबरला मिनी ट्रेन नेरळ रेल्वे स्थानकातून धावेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय संचालन व्यवस्थापक (कोचिंग) मुंबई विभाग आदिश पठानिया यांनी माध्यमांना दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी होणार आहे.

नेरळ ते माथेरान हा सुमारे २१ किलोमीटर लांबीचा डोंगराळ आणि निसर्गरम्य रेल्वेमार्ग आहे. या मार्गावर दऱ्या, खोऱ्या आणि घनदाट जंगलातून ट्रेनचा प्रवास हा पर्यटकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरतो. माथेरानच्या पर्यटन अर्थव्यवस्थेत या मिनी ट्रेनचं विशेष स्थान असून, देश-विदेशातून हजारो पर्यटक दरवर्षी या रेल्वे प्रवासाचा आनंद घेतात.

१९०७ मध्ये सर ‘आदमजी पिरभॉय’ नावाच्या पारशी गृहस्थाच्या प्रेरणेने ही झुकझुकगाडी सुरू झाली. तब्बल शंभराहून अधिक वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, दरवर्षी पावसाळ्यानंतर ट्रेन बंद करून दसऱ्याच्या सुमारास पुन्हा सुरू केली जाते. मात्र यंदा पावसाचा अतिरेक आणि भू-स्खलनामुळे ही सेवा उशिरा सुरू झाली.

दरम्यान, अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा सुरू असल्याने पर्यटकांना काही प्रमाणात दिलासा मिळत होता. आता मिनी ट्रेन सुरू झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

रेल्वे प्रशासनाने सर्व दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणी पूर्ण केली असून, ट्रेन सेवा सुरळीत सुरू होईल, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय संचालन व्यवस्थापक (कोचिंग) मुंबई विभाग आदिश पठानिया यांनी माध्यमांना माहिती दिली.

मिनी ट्रेनचा प्रवास हा केवळ वाहतुकीचे साधन नसून माथेरानच्या पर्यटनाचा आत्मा मानला जातो. त्यामुळे तिच्या पुनर्प्रारंभामुळे पर्यटक आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

शिवनेरी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे