दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक दीपक जाधव.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ३१ जुलै : ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी प्रभाग क्रमांक २८ चे नगरसेवक दीपक जाधव यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जामुळेच अध्यक्षपदाची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. दिवा प्रभाग समितीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीचे एकूण ११ नगरसेवक असून, संख्याबळाच्या जोरावर दीपक जाधव यांची अध्यक्षपदी निवड होणे निश्चित झाले होते. अखेर त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
दीपक जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पक्षाचे प्रमुख स्थानिक नेते तसेच दिवा शहरप्रमुख व नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता दीपक जाधव यांच्या खांद्यावर आली असून, त्यांच्या निवडीचे शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.



