ब्रेकिंग

ब्रेकिंग ; केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर कोसळले भाविकांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

[wps_visitor_counter]

 

उत्तराखंड ता १५ जून २०२५  :
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात रविवारी सकाळी एक दु:खद घटना घडली आहे. केदारनाथ धामला जात असलेलं एक हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण पाच जण होते आणि दुर्दैवानं पाचही जणांचा मृत्यू झाला आहे.

ही घटना रविवारी पहाटे सुमारे 5.30 वाजता घडली. आर्यन कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं. अपघाताचं मुख्य कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर क्रॅशची माहिती नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी दिली आहे. गौरीकुंडच्या वर गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. सदर दुर्घटनांमुळे स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी तातडीने पोहोचले आहे. ही अतिशय दु:खद घटना आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे