आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

महिला दिनानिमित्त नेरळमध्ये व्यापाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व सीपीआर प्रशिक्षण शिबिर

[wps_visitor_counter]

नेरळ: सुमित क्षिरसागर

नेरळ :१० मार्च: महिला दिनाचे औचित्य साधून व्यापारी वेल्फेअर असोसिएशन व श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ मल्टीस्पेशलिटी अँड क्रिटिकल केअर सेंटरच्या सहकार्याने नेरळ येथील बापुराव धारप सभागृहात ८ मार्च रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व सीपीआर (CPR) फर्स्ट एड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या शिबिरात नेरळमधील व्यापारी वर्गातील सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सीपीआर प्रशिक्षण, शुगर तपासणी, फर्स्ट एड प्रशिक्षण, ब्लड प्रेशर तपासणी, ईसीजी तपासणी तसेच एक्स-रे तपासणी या सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. याउपक्रमाला व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. नेरळ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विवेक भगत तसेच क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. हेमंत इंगोले आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय स्टाफच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.

या वेळी व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष विशाल साळुंखे, उपाध्यक्ष प्रीतम गौरी व पंढरी हजारे, सेक्रेटरी मेहुल कटारिया, सहसेक्रेटरी कमलेश ठक्कर, खजिनदार अमित जैन, सहखजिनदार दिनेश जैन, सल्लागार सलीम तांबोळी, सुधाकर देसाई, निलेश शहा, मनोहर अहिरे, महेश कटारिया, अरविंद कटारिया, ललित जैन तसेच मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग उपस्थित होते.

या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून व्यापारी वर्ग व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत सीपीआर व फर्स्ट एडचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. आयोजकांच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

4/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे